एकदा एक श्रीमंत बाप आपल्या मुलाला गरीबी काय असते ते दाखविण्यासाठी एका दूरच्या खेड्यात सहलीसाठी घेऊन जातो. तिन दिवस व रात्री तेथे राहिल्यानंतर ते पुन्हा आपल्या शहरातील बंगल्यात येतात. सहलीवरून परतल्यानंतर वडील मुलाला प्रश्न विचारतात “सहल कशी होती?”
मुलगा: ”खूपच छान! बाबा.”
वडिल: ”गरीब लोक कसे राहतात हे तू बघितलेस ना?”
मुलगा: ”हो.”
वडिल: ”तर मग मला सांग की या सहलीमधून तुला काय शिकायला मिळाले.”
मुलगा उतरला: ”आपल्याकडे एक कुत्रा आहे आणि त्यांच्याकडे चार. आपल्या बागेच्या मधे एकच छोटासा तलाव आहे अन् त्यांच्याकडे विस्तीर्ण सरोवर. आपल्या बागेत परदेशातून मागविलेले किंमती विद्युत दिवे आहेत तर त्यांच्या बागेत आकाशातील तारे. आपले आंगण समोरच्या रस्त्यजवळ संपते. तर त्यांचे आंगण क्षितिजपर्यंत विस्तरालेल.”
“आपण जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यात राहतो तर त्यांच्याकडे नजरेच्या पलीकडे पसरलेली जमीन आहे.”
“आपल्याकडे सेवा करण्यासाठी नोकर आहेत तर ते दुसर्यांची सेवा करतात.”
“आपण आपले अन्न खरेदी करतो तर ते स्वत:चे अन्न स्वत: पिकवितात.”
“आपल्या बंगल्याचे रक्षण करण्यासाठी बाजूला भिंत आहे. पण त्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला त्यांचे मित्र आहेत.”
यावर मुलाचे वडील निरूत्तर झाले.
शेवटी मुलगा उतरला:”धन्यवाद बाबा! आपण किती गरीब आहोत हे दाखविल्याबद्दल.”