अे.अे. एक दृष्टीक्षेप

प्रस्तावना

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस म्हणजे अनामिक मधपी, ही पुरुष व स्त्री यांची संघटना आहे. ह्या संघटनेतील सभासद आपले वेक्तीगत अनुभव एकमेकांना सांगतात की ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते व नवजीवनाची अशा स्पुरते. अशा तऱ्हेने सभासद अपुले स्वतःचे तसेच दुसऱ्याचे प्रश्न सोडवतात, आणि दारू पासून दुर राहतात.

ह्या संघटनेत सामील होण्यास फक्त एकच अट आहे की, मधाच्या आजारातून मुक्त होण्याची इच्छा असली पाहिजे. संघटनेत सामील होण्यास कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. संघटना कुठलाही धर्म किंवा सामाजीक अथवा राजकीय तत्वांचा प्रचार करत नाही, इतर कोणत्याही धार्मिक, सामाजीक किंवा राजकीय पक्षांशी ह्या संघटनेचा संबंध नाही. संघटनेच ध्येय एकच आहे की, मधापासून स्वतःला दुर ठेवणे आणि ज्यांना दारूपासून मुक्ती मिळविण्याची इच्छा आहे अशा इतर मधपिडित लोकांना मदत करने.

वरील प्रस्तावना ए.ए. ग्रेपवाईन, इंकॉर्पोरीटेड़, न्यूयॉर्क, हांच्या परवानगीने छापली आहे.

`अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’ ही विश्वव्यापी संघटना आहे. जगातील १८० हून अधिक देशांमध्ये सुमार १ लाख समुहांद्वारे २०,०००,०० अधिक व्यक्ति मद्यपानापासून दूर राहून आनंदी सुखी-समाधानी जीवन जगत आहेत. दारू सोडण्याची इच्छा असणे ही एकमेव अट या संघटनेमध्ये प्रवेश घेण्यास पुरेशी आहे. मद्यपान थांबविणे या कार्यक्रमाची सुरूवात असली तरी मद्यपींच्या व्यक्तिमत्त्वामध्य अमूलाग्र परिवर्तन करण हे या संघटनेचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी १२ पायऱ्यांचा कार्यक्रम सूचविलेला आहे. विशेष म्हणजे या संघटनेत नियम वा कायदे, अजिबात नाहीत. कुठलीही सक्ती, दबाव आणि दडपण नाही. संपूर्ण स्वायत्तता आणि स्वातंत्र्य आहे.

अमेरिकतील दोन मद्यपिंनी एकत्र येऊन या संघटनेच्या विचारसरणीला जन्म दिला. शेअर बाजारातील दलाल बिल डल्ब्यू. आणि शल्यविशारद डॉ.बॉब यांची पहिली भेट १० जून १९३५ रोजी अमेरिकेत  न्यूयॉर्क शहराजवळ अ‍ॅक्रॉन या गावात झाली. बिल डब्ल्यूंनी स्वत:ची दारूची ओढ थांबविण्यासाठी डॉ.बाब यांचा शोध घेतला. पहिल्या भेटीतच त्यांनी स्वत:चे अनुभव व मद्यपाश आजारावर डॉ.बॉब यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. वैद्यकीय शास्त्र, धर्मशास्त्र आणि मद्यासक्तांचे अनुभव या मिश्रणाच्या जोडीला परस्परांची गरज ही संकल्पना जन्माला आली. त्यातून अ‍े.अ‍े.ची निर्मिती झाली. बिल डब्ल्यूचे अनुभवकथन ऐकल्यानंतर डॉ.बॉब म्हणाले की, माझी भाषा बोलणारा पहिला माणूस भेटला.

१० जून १९३५ पासून डॉ.बॉब मद्यपानापासून दूर झालेत म्हणून तो दिवस अ‍े.अ‍े संघटनेचा स्थापना दिन म्हणून जगभर पाळतात. अ‍ॅक्रॉनमध्ये पहिला समूह डॉ.बॉब व बिल डब्ल्यू. यांच्या प्रथम भेटीतून आरंभ झाल्यानंतर न्यूयॉर्कमध्ये दुसरा समूह सुरू झाला. १९३७ पर्यंत ४० मद्यासक्तांना लाभ झाला होता. या उपायाचा अधिक प्रसार व्हावा म्हणून १९३९ मध्ये `अल्कोहोलिक्स  अ‍ॅनॉनिमस’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. ग्रंथाचेच नाव या संघटनेने धारण केले आहे. मद्यपींच्या आयुष्यात मद्यासक्तीपुढे हतबलता मान्य केल्यावरच अ‍े.अ‍े.कार्यक्रम मद्यपींना चांगले जीवन जगण्यास मदत करू शकतो.

भारतात सन १९५८ मध्ये अ‍े.अ‍े.ची सुरूवात झाली. आज अनेक राज्यांमध्ये, शहरांमध्ये अ‍े.अ‍े.समूह कार्यरत आहेत. मुंबई येथे जनरल सर्विस ऑफिस या नावाने अ‍े.अ‍े.चे मुख्य कार्यालय आहे. संपुर्ण भारतात १२०० व महाराष्ट्रतात जवळपास ३२५ समूहांमधून दर आठवडयाला हजारो अे.अे. सभा घेतल्या जातात. भारतात साधारण ३०,००० अे.अे. सभासद वेगवेगळ्या अे.अे. सभांमध्ये उपस्थित राहतात.

अ‍े. अ‍े. काय करीत नाही

मद्यपानापासून स्वत:ला दूर ठेवणे आणि ज्यांना मद्यपानापासून दूर होण्याची इच्छा आहे, त्यांना मदत करणे हेच अ‍े.अ‍े.चे ध्येय असून मद्यपीच्या व्यक्तिमत्तवामध्ये अमूलाग्र परिवर्तन घडविणे असे अंतिम उद्दिष्ट आहे. अ‍े.अ‍े.संघटना धर्म, राजकारण, व सामाजिक तत्त्वांचा प्रचार करीत नाही किंवा अशा कोणत्याही संस्थांशी अ‍े.अ‍े. चा संबंध नाही. मद्यसक्तींच्या समस्येशी निगडीत असलेल्या अन्य संघटना, संस्था यांचेशी संलग्न न होता; सहकार्याची भूमिका ठेवून त्यांना मदत करणेचे धोरण अ‍े.अ‍े. ने संमत केलेले आहे. त्यामुळे अ‍े.अ‍े. बाह्य विषयाची मत व्यक्त करित नाही. तसेच कोणत्याही विषयाचा पुरस्कार किंवा निषेध करित नाही.

त्याचप्रमाणे मद्यपींना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, वैद्यकीय किंवा मानसशात्रीय रोग चिकित्सा करणे, औषधोपचार करणे, धार्मिक सेवा, भोजन, कपडालत्ता, नोकरी पैसा किंवा अन्य कल्याणकारी सेवा पुरविणे, वकील न्यायाधिकारी मालकवर्ग ह्यांना शिफारसपत्र देणे किंवा कोणाही मद्यासक्तांची जबाबदारी स्वीकारणे या बाबी अ‍े.अ‍े. ही संघटना अजिबात करत नाही.

वैद्यकीय उपचारात मद्यपानाच्या विळख्यातून बाहेर पडण्याकरिता उपाय नाहीत. किंबहूना आज देखील प्रगत वैद्यकीय क्षेत्रात वेगाने वाढणारे अतिरेकी, अविवेकी मद्यपान थांबविण्याकरिता काही औषध उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. मद्यमुक्तीच्या क्षेत्रात यशस्वी व परिणामकारक मार्ग म्हणून आज अनेक वैद्यकीय क्षेत्रतील डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, सामाजिक चळवळी, कार्यकर्ते अ‍े.अ‍े.ला बाहेरून मदत करित आहेत. किंबहुना अशा व्यक्तींचा वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसारण माध्यमांचा अ‍े.अ‍े.विस्ताराकरिता फार मोठा हातभार लागलेला आहे; असा इतिहास आहे.