प्रथमच अे.अे. संघटनेत येणाऱ्यांसाठी हे माहिती पत्रक आहे. नवीन येणाऱ्या व्यक्तीच्या मनात असलेले प्रश्न – जे आम्ही जेव्हा प्रथम आलो तेव्हा आमच्याही पुढे उभे होते – सोडवण्याचा प्रत्यन येथे करीत आहोत.
मी मधपी किंवा दारुडा आहे का?
परत परत इच्छेपेक्षा जास्त तुम्ही पित असाल, पिण्यामुळे वारंवार अडचणीत येत असाल, प्यालानंतर बऱ्याच वेळा विस्मरण होत असल्यास, आपण मधपी, दारुडे, शराबी, किंवा अल्कोहोलिक असू शकता.
परंतु हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. अे.अे. मधील कोणीही तुम्हाला तुम्ही मधपी आहात किंवा नाही हे सांगणार नाहीत.
माझ्या पिण्याबद्दल मला काळजी वाटते , तरी मी काय करावे?
मदत घ्या. अल्कॉहोलीक्स अॅनॅानिमस् आपल्याला मदत करू शकेल.
अल्कॉहोलीक्स अॅनॅानिमस् म्हणजे काय?
अे.अे. म्हणजे मर्यादित प्रमाणात दारू पिण्याची ताकद घालवून बसलेल्या व त्यामुळे व त्यामुळे निरनिरळ्या प्रकारच्या संकटात सापडलेल्या स्त्री-पुरुषांची संगटना आहे. आम्ही दारू विरहित आनंदी जीवनाचा मार्ग शोधत आहोत. आमच्यापैकी बहुतेकांस त्यात यश मिळाले आहे. आम्हास समजले आहे की ह्यासाठी आम्हाला अे.अे.मधील इतर सभासादांच्या मदतीची व आधाराची गरज आहे.
जर मि अे.अे. च्या सभेला हजर राहिलो तर त्यामुळे माझ्यावर काही बंधने येतील का?
अे.अे. सभासदांची यादी अथवा हजेरीपट ठेवला जात नाही. तुम्हाला स्वतःबद्दल काही माहिती देण्याची गरज नाही. तुम्हाला परत यावयाचे नसल्यास कोणीही आपला पाठपुरावा करणार नाहीत.
अे.अे. मध्ये माझी भेट माझ्या ओळखीच्या लोकांशी झाल्यास काय होईल?
तुम्ही ज्या कारणासाठी येथे आला आहात, त्याच कारणांसाठी ते सुद्धा येथे आले आहेत. ते तुमचे नाव बाहेर उघड करणार नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे अनामिकता पाळू शकता. या कारणांसाठी आम्ही स्वतःला “अनामिक अथवा निनावी मधपी” म्हणवितो.
अे.अे. सभांमध्ये काय चालते?
अे.अे.च्या सभा निरनिराळ्याप्रकारे चालविल्या जातात. परंतु सर्व सभांमधून तुम्हाला मधपी, मधपणामुळे त्यांच्या जीवनात व व्यक्तीमत्वात काय स्थित्यंतरे घडली, मध थांबविण्यासाठी त्यांनी स्वतः काय प्रयत्न केले व आता ते कसे आयुष्य जगत आहते ह्याबद्दल बोलताना आढळतात.
ह्या सभांमुळे मला माझी मधपाणीची समस्या सोडविण्यास कशी मदत होईल?
आम्हा सभासदांना, दारूची आसक्ती किती तीव्र असते याची जाणीव आहे. स्वतःला व दुसऱ्यांना मध न पिण्याची दिलेली आश्वासने पाळू न शकल्याने दुःख आम्हाला माहित आहे. आम्ही उपचार करणारे धंदेवाईक नाही. दुसऱ्या मधप्याला मदत करण्यासाठी आम्ही स्वतः मधमुक्त आहोत ही एकच जमेची बाजू आहे. मधपाणीची समस्या असलेले जेव्हा अे.अे.मध्ये येतात तेव्हा त्यांना सुधारणा शक्य आहे याची जाणीव होते कारण ते अे.अे.त सुधारणा झालेले सभासद पाहतात.
अे.अे.चे सभासद सुधारणा झाल्यानंतरसुद्धा वरचेवर सभांना का हजर राहतात?
आम्हा अे.अे. सभासदांची खात्री आहे की, मधपाश हा आजार कधीही पूर्णपणे बरा होत नाही. आम्ही कधीही मर्यादित मधपान करू शकणार नाही आणी आमची मधापासून दूर राहण्याची क्षमता ही आमच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक निरोगीपणा टिकण्यावर अवलंबून आहे. हा निरोगीपण आम्ही नियमितपणे सभांना हजर राहून व तेथे समजलेल्या तत्वांचे आचरण करून मिळवीता येतो. या व्यतिरिक्त आम्हास समजले की इतर मधपिडीतांना मदत केली तर आम्हास मधमुक्त राहण्यास मदत होते.
अे.अे. चा सभासद कसे होता येईल?
जेव्हा तुम्ही स्वतःला अे.अे. सभासद म्हणवाल तेव्हा तुम्ही अे.अे. सभासद व्हाल. अे.अे.चा सभासद होण्यासाठी मधापासून दूर राहण्याची इच्छा असणे हीच एकमेव आवश्यकता आहे आणी आमच्यापैकी बरेचजण प्रथम आले तेव्हा त्याबदल साशंक होतो.
अे.अे.चा सभासद होण्यासाठी वर्गणी किती आहे?
अे.अे.चा सभासद होण्यासाठी कोणतिही वर्गणी नाही. अे.अे.चा समूह सर्वसाधारणपणे सभांमधून निधी जमवतो व त्याचा विनियोग भाडे, चहा इत्यादीचा खर्च भागविण्यासाठी होतो. सभासद स्वेच्छेने या निधीमध्ये सहभागी होतो.
अे.अे. कोठल्या धर्माशी सलंग्न आहे का?
नाही. धर्म, राजकारण किंवा इतर संस्था यांच्यापासून अे.अे. अलिप्त आहे.
तरीही तेथे ईश्वर या विषयावर बरीच चर्चा का होते?
बहुसंख्य अे.अे. सभासदांचा विश्वास आहे की, मधपानाच्या समस्येवरचा उपाय हाहा त्यांना स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर मिळालेला नसून, आपल्यापेक्षा उच्च शक्तीकडून मिळालेला आहे. ह्या उच्च शक्तीची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या समजुतीप्रमाणे करतो. पुष्कळजण याला देव म्हणतात; काहीजण अे.अे.हीच उच्चशक्ती मानतात तर काहीजानाचा या संकल्पनेवर अजिबात विश्वास नसतो. अे.अे.मध्ये सर्व प्रकारच्या आस्तिक, नास्तीक लाकांसाठी प्रवेश आहे.
आमच्या नातेवाईकांना आम्ही सभांना आणु शकतो का?
“खुल्या” सभांना नातेवाईक, मित्र, हितचिंतक मंडळी येऊ शकतात. स्तानिक गटांतून चोकशी केल्यास अधिक माहिती मिळेल.
नवीन सभासदांना काय सूचना अथवा मार्गदर्शन दिले जाते?
अ) पहिल्या घोटापासून दूर रहा.
ब) नियमित सभांना हजर रहा.
क) मधमुक्त असलेल्या सभासदांबरोबर ओळखी वाढवा व त्यांच्या बरोबर रहा.
ड) अे.अे.च्या बारा तत्वांचा कार्यक्रम दैनंदिन जीवनात आचरणात आणा.
अे.अे.शी संपर्क कसा साधता येईल?
अे.अे. जनरल सर्व्हिस ऑफिस ऑफ इंडिया किंवा आपल्या जवळच्या अे.अे. इंटर ग्रुपशी किंवा आपल्या अे.अे. सभेशी संपर्क साधा.
लक्षात ठेवा मधपाश हा वाढत जाणारा आजार आहे. जरी आपणास वाटत असले की आपण ह्या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत आहोत, तरी आपण याचा गांभीर्याने विचार करा. मधपाश हा जीवघेणा आजार आहे. जर आपण मधपी असाल आणी जर आपण मधपान सुरूच ठेवले तर थोड्याच काळात आपली पर्रिस्थिती चिंताजनक होईल.
अे.अे. सर्व साधारण सेवा परिषदेने समंत केलेले साहित्य.