ए.ए. – करोना महामारी [COVID-19] च्या कठीण काळात

नमस्कार,

 

विषय : मद्यापासून सुटका आणि त्यानंतर चा सुधारणेचा कार्यक्रम आणि हेल्पलाइनच्या , या कठीण काळात अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसद्वारे पर्यायी केलेली उपाययोजना, ऑनलाईन सभा व संसाधने.

 

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (ए.ए.) ही बंधुभाव संस्था पूर्वाश्रमीचे मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबियांना जगभरात स्थापित असलेल्या समुहांद्वारे एए च्या कार्यक्रमाद्वारे आशा आणि मुक्तता प्रदान करते. जगभरामध्ये ए.ए च्या मीटिंग सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी जसे की शाळा, रुग्णालये, महाविद्यालये आणि संबंधित संस्थांमध्ये आयोजित केल्या जातात. अशाप्रकारे कोट्यवधी मद्यपी मद्यपान करण्यापासून दूर झाले आहे. तथापि, या वेळी Corona साथीच्या आजारामुळे , सामाजिक अंतर दूर ठेवण्याच्या सूचनांमुळे सर्व सभा आणि संमेलन स्थाने बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यत्यय आला आहे ज्यामुळे एए संदेश प्रसारित करण्याच्या पद्धतींमध्ये तात्काळ बदल करण्यात आला आहे.

मद्यापासून दूर राहून सुधारणेचा कार्यक्रम व संदेश देण्यासाठी इतर पर्यायी साधनांद्वारे जसे की ऑनलाईन मीटिंग बाबत ए.ए. ने जागतिक पातळीवर पाऊल टाकले आहे .

भारतात आम्ही अनेक राज्यांमध्ये विविध भाषांमध्ये २०० ऑनलाईन सभा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात २५ ऑनलाईन मीटिंगज आहेत. दारू थांबविण्याची ज्यांची इच्छा आहे आणि थांबलेली दारू थांबलेली रहावी अश्या व्यक्ती या ऑनलाईन मीटिंग मध्ये भाग घेऊ शकतात. या मीटिंग पूर्णपणे विनामूल्य आणि निनावी आहेत (फक्त ऑडियो) आम्ही व्यक्तीचे व्हिडिओ प्रसारित करत नाही. निनावीपणाची पूर्णपणे काळजी घेतली जाते व कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात नाहीत.

सद्या काही पिणाऱ्या व्यक्तींनी अचानक दारू पिणे थांबवल्यामुळे त्यांना होणारा त्रास व स्वतःचे बरे वाईट करून घेणे अश्या अनेक घटना घडल्या आहेत आणि अशा रूग्णांना वैद्यकीय चिकित्सक, मानसोपचारतज्ज्ञ आणि रूग्णालयात भरती करणे असे उपाय सुचविणे आवश्यक आहे.  याकरिता शासनाने हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत.

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस  या बंधुभाव संस्थेने महाराष्ट्रभर स्वतःची हेल्पलाइन तयार केली आहे. ज्या व्यक्तींना दारू पिणे थांबविण्याची इच्छा आहे अश्या व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंबीय, यांना ए.ए. बद्दल अधिक माहिती हवी असल्यास व ए.ए. कसे कार्य करते हे जाणून घेण्यासाठी आमच्या ऑनलाइन सभांना उपस्थित राहू शकतात किंवा ए.ए. च्या सदस्यांशी बोलू शकता. जागातील कोट्यावधी लोकांसारखे मद्यापासून दूर राहून आनंदी व सुखी जीवन जगण्यासाठी आम्ही ऑनलाईन सभांमध्ये आपले स्वागत करीत आहोत.

आम्ही एकेकाळी मद्यपाश या आजाराला बळी पडलो होतो आणि आम्हाला हे माहित आहे की स्वतःचे अनुभव कथन करणे ही पद्धत इतर मद्यपिंना दारूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरते. या कठीण काळामध्ये आशा आणि प्रेमाचा हा संदेश देण्यासाठी आम्ही वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम यातील आमचे हितचिंतक यांचेकडून सहकार्य घेत आहोत.

ए.ए. आणि मद्यपाश याबद्दल ज्यांना माहिती हवी असेल  तसेच ज्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. सदर सेवा २४ तास उपलब्ध आहे.

ही संस्था स्त्री व पुरुष यांच्यासाठी आहे, ज्या स्त्रीला सदर मद्यपान थांबविणे कठीण होत असेल तर त्यांचे आम्ही फेलिशिप मध्ये स्वागत करतो, त्यांनी कोणताही संकोच न बाळगता आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा ते आपणास आमच्या फेलोशिप मधील महिला सभासदांशी संपर्क साधून मदत करतील .

 

ए.ए. च्या संपर्कासाठी भाषा पर्यायासह मुंबई व उर्वरित महाराष्ट्रासाठी हेल्पलाइन नंबर्स पुढीलपरमाणे :

 

1) विजय 9920111772 (मुंबई – इंग्रजी, हिंदी)

2) मिलिंद 8291976574 (कल्याण – इंग्रजी, हिंदी)

3) अमोल 8888128883 (पुणे-मराठी)

4) सतीश 9822830363 (नागपूर- मराठी)

5) साईनाथ 8806517299 (गडचिरोली – मराठी)

6) रमेश 7 7 24२3333749 (औरंगाबाद – मराठी)

 

आपला आभारी

 

विजय सी

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस (पश्चिम मुंबई इंटरग्रुप)

जनमाहिती अध्यक्ष

मोबाइल नंबर 9920111772

You may also like...